Ajay Kandewar,Wani :- वणी नगर परिषदेच्या कर विभागातील अधिकारी व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करून करवसुली करताहेत तरीही मालमत्ता कर व पाणी पट्टी, घरपट्टी कर अशी करोडोची थकबाकी असून, नागरिकांनी कर भरून नगर नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले. वसुलीची टक्केवारी फार मोठी काहीं झाली नसल्याने उदया मार्च एन्ड दिं 31 मार्च आणि विशेष सार्वजनिक सुट्टी आहे. तरीही वणी कर भरणा कार्यालय (न. प.Tax Office) सूरू असेल त्याकरिता तत्काळ कर भरणा करावा,असे आवाहन वणी नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी केले आहे.
•वेळेवर कर भरा, स्वत:चे नुकसान टाळा :
शहर स्वच्छ, सुंदर व सर्व सुविधायुक्त हवे असल्यास शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. शासनाच्या वतीने शहराच्या विकासासाठीच नागरिकांकडून कर वसुली केली जाते. या करवसुलीतूनच शहरात विविध सुविधा पुरविल्या जातात. मात्र काही नागरिक जाणून कर भरण्यास विलंब करतात. कर न भरल्यास यात नुकसान कर न भरणाऱ्यांचे आहे, ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही. शासनाच्या नवीन धोरणानुसार थकीत करावर व्याज आकारल्या जात आहे. ते वेळेवर न भरल्यास फार मोठे नुकसान ग्राहकांचे होऊ शकते. त्याकरिता वेळेवर कर भरा, स्वत:चे नुकसान व जप्तीही टाळा आणि उद्या सोमवार दि.31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्याकरिता ससमस्त नागरिकांनी कर भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी नागरिकांना केले आहे.

