Saturday, May 9, 2026
HomeBreakingआ.देरकर यांचे विश्वासू "फैजल" या नवीन चेहऱ्याला संधी द्याच.......!

आ.देरकर यांचे विश्वासू “फैजल” या नवीन चेहऱ्याला संधी द्याच…….!

Ajay Kandewar,Wani : येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पुन्हा एकदा नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगू लागली आहे. त्यात राजूर-चिखलगाव गट फैजल बशीर खान या तरुणाच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत असून, स्थानिक पातळीवर त्याला मोठे समर्थन लाभत आहे.

स्व. बशीर खान हे राजूर शहरातील एक सामाजिक चेहरा आणि सर्वधर्मीयांमध्ये आदराचे स्थान असलेले नाव होते. त्यांच्या जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि गरीबवर्गीयांशी जोडलेल्या नात्याचा वारसा फैजल खानने समर्थपणे पुढे नेला आहे. त्याच्या कार्यामुळे युवकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.गेल्या काही वर्षांत फैजल खानने समाजातील सर्व घटकांमध्ये संवादाचे पूल बांधत सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावली. त्याने धर्म, जात-पात बाजूला ठेवून सामान्य नागरिकांच्या अडचणींवर उपाययोजना केल्या. त्यामुळेच आज फैजल समाजमनात विश्वासार्ह आणि लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखला जातो.राजूर परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये फैजल खानच्या उमेदवारीने चैतन्य निर्माण केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्याच्याकडे आशेने पाहत असून, पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत तो एक बलाढ्य स्पर्धक ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.फैजल खान हा तरुणाईचा आवाज आणि समाजातील एकतेचे प्रतीक बनला आहे. वडिलांच्या समाजसेवेचा वारसा घेऊन त्याने स्वतःच्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली असून, राजूर-चिखलगाव गटात त्याचे नाव उमेदवारांच्या चर्चेत अग्रस्थानी आहे.

थकलेल्या चेहऱ्यांना द्या आता विसावा………

थकलेल्या चेहऱ्यांना द्या आता विसावा,नवीन उमेद देईल नव्या चेहऱ्याचा प्रकाशवा,जुने क्षण ठेवूया आठवणींच्या पानावर,संधी द्या नव्या सुरुवातीच्या प्रवासावर. ….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page