Ajay kandewar,Wani :- तालुक्यातील राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बोगस कारभार,नियमित वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी, रुग्णांची होत असलेली हेळसांड, कर्मचाऱ्यांचा विस्कळीत कारभार आणि सुविधांचा अभाव यामुळे PHC चा संपूर्ण कारभार “सलाईनवर” गेल्यासारखा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. विशेषतःमिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर राहुल चिखलीकर यांच्याबाबत “आळशी डॉक्टर” अशी चर्चा गावागावात सुरू असून, डॉक्टर तेजस अस्वले यांच्यावर “कामचुकार डॉक्टर” असा थेट आरोप ग्रामस्थांकडून ऐकावयास येत आहे.
राजूर गावात आता “कर्मचारी बनला डॉक्टर आणि डॉक्टर बनले कामचुकार” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा अपुऱ्या असून, अनेकदा रुग्णांना खासगी दवाखान्याचा पर्याय शोधावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. आरोग्य केंद्रातील अनियमितता आणि दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे, या दोन्ही डॉक्टरांविरोधात गावामध्ये आता उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असून, “या दोघांना राजूर PHC मधून हटवा” अशी मागणीही जोर धरू लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, जनतेचा आरोग्याशी खेळ करणाऱ्यां या “दोन महारथीमुळे “संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र असल्याची चर्चा गावात रंगत आहे.
आमदार “या कामचुकार” अधिकाऱ्यांना”आपले म्हणतात की तूपले” ….
दरम्यान, या सर्व प्रकरणात (THO) आणि (DHO)नेमकी काय भूमिका घेतात की थातूरमातूर काहीतरी “कागद रंगवून” प्रकरण सेटल करतात किंवा जाणे दो ” ची भूमिका दाखवितात का ? कारण राजूर येथील PHC बाबत वारंवार अशा कामचुकार व आळशी अधिकाऱ्यांची तक्रार आल्यानंतरही वणी विधानसभा आमदार संजय देरकर जनतेचा आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर या अधिकाऱ्यांना “आपलेच” म्हणून “दया -माया” दाखवितात की,चौकशी व शिस्तभंग कारवाई करिता पाठपुरावा करतात? याकडे सध्या जनतेचे लक्ष लागले आहे.
पुढील भाग क्रमशः….

