•पाटण पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी .
•बैलजोडी परत मिळाल्याने शेतकऱ्यास गहिवरून आले.
अजय कंडेवार,वणी:- पाटण शिवारातील बंडयाचे कुलूप तोडून गोठ्यात बांधून ठेवलेले 80 हजार रु किंमतीचे 2 बैल अज्ञात इसमाने चोरून नेल्या प्रकरणी गोपाळकृष्ण राजगडकर (52 वर्ष) रा.पाटण, ता-झरी,जि. यवतमाळ यांचा तक्रारीवरून 21 फेब्रु रात्री गुन्ह्याची नोंद घेताच ,पाटण ठाणेदार संदीप पाटील व पथकांनी तपासाला जलद गती दिली. शिवाय अवघ्या 12 तासाच्या आत बैलजोडी चोरीचा छडा लावून बैलजोडी चोरणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पाटण पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.In just a few hours, the theft was done,Remarkable performance of Patan Police

पाटण पोलिसांनी घटनास्थळ परिसरात जाऊन माहिती घेतली तसेच नजीकच्या तेलंगाणा राज्यातील बेला येथे जाऊन पोलिसांनी एक संशयितास ताब्यात घेतले व कौशल्याने विचारपूस केली असता,वसंता धाडांजे रा.बेला, जिल्हा आदीलाबाद याने त्याचा साथीदार नंदू धाडांजे रा.दुर्भा, ता.झरी, जिल्हा यवतमाळ यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यावरून पाटण पोलिसांनी दुसऱ्या आरोपीसह अनंतपुर ता.बेला जिल्हा आदीलाबाद येथील शिवारात एका नाल्याच्या काठी लपवून ठेवलेले 80 हजार रुपये किंमतीचे 02 बैल (बैलजोडी) रयांच्याकडून हस्तगत केले.
या दोघांना दि.22 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात पाटण पोलिसांनी शिताफीने माहिती काढून शेतकऱ्याची बैलजोडी शोधून आरोपींना अटक केली तसेच बैलजोडी परत मिळाल्याने शेतकऱ्यास गहिवरून आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश कींद्रे यांच्या मार्गदर्शनात पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार API संदीप पाटील, रतिष वानखेडे, प्रशांत तलांडे, सचिन गाडगे, अमित पोयाम,सदाशिव माथांकर ,इरफान शेख, नंदू कुंटवार यांनी केली आहे.

