Thursday, August 6, 2026
HomeBreaking९७ लाखाचा दरोडा प्रकरण : शिरपूरचे ठाणेदार मनवर आणि LCB API पेंडकर...

९७ लाखाचा दरोडा प्रकरण : शिरपूरचे ठाणेदार मनवर आणि LCB API पेंडकर ठरले कारवाईचे ‘हिरो’….

Ajay,Wani: पांढरकवडा  तालुक्यातील मोहदा येथे घडलेल्या गाजलेल्या दरोडा प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत यवतमाळ पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सात विशेष पथके स्थापन करून आरोपींचा शोध घेण्यात आला. फिर्यादीनुसार एकूण या प्रकणात ७ इसम होते. त्यातील तीन इसमांना अटक करण्यात आली असून ४ इसमाचा शोध अद्याप सुरू आहे.या कारवाईत सुमारे १८ दिवसांत  ३३.५० तोळे सोन अंदाजे किंमत ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र या संपूर्ण तपास आणि रिकव्हरी मोहिमेत सात पथकात एलसीबी वणी शाखेचे एपीआय दत्ता पेंडकर आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांनी ही महत्वाची बजावलेली भूमिका विशेष ठरली आहे.

तांत्रिक तपास, आरोपींचा माग काढणे, माहितीची साखळी उलगडणे आणि मुद्देमाल जप्त करण्याच्या कारवाईत एपीआय दत्ता पेंडकर यांनी प्रभावी नियोजन करत पथकाला महत्त्वाची दिशा दिली. तर ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल ३१ तोळे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित मुद्देमाल इतर पथकांनी हस्तगत केला. सर्वात महत्त्वाची भूमिका ठाणेदार संतोष मनवर यांनी केली.या दोन्ही अधिकाऱ्यांच्या धाडसी व अचूक कारवाईमुळे तपासाला वेग मिळाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातही पथकांनी समन्वयाने काम करत कोट्यवधींच्या दरोडा प्रकरणाचा उलगडा केला. मात्र या संपूर्ण मोहिमेत एलसीबी वणी शाखेचे एपीआय दत्ता पेंडकर आणि शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर यांनी दाखविलेले तपासकौशल्य, धाडस आणि रिकव्हरीतील मोलाचे योगदान यामुळे ते या गाजलेल्या कारवाईचे हेही ‘दोन हिरो’ ठरल्याची यवतमाळ पोलिसात रंगत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page