गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी
नागेश रायपूरे, मारेगाव:-अवैध दारू विक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील हटवांजरी येथील महिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनवर धडक दिली.यावेळी येत्या चार दिवसांत त्या अवैध दारू विक्रेतावर कारवाई न झाल्यास आपल्या कुटूंबासह पोलीस स्टेशन समोर उपोषणाचा ईशाराही दिलेल्या निवेदनातुन हटवांजरी येथील महिलां मंडळांनी दिला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून हटवांजरी येथे छुप्या पद्धतीने राजाराम घोडाम, अमोल कुडमेथे रा.हटवांजरी तसेच बुरांडा येथील पवार नामक हे तीन व्यक्ती गावात अवैध रित्या देशी दारू विक्री करत आहे.यामुळे गावातील बालक व तरुण वर्ग नशेच्या आहारी गेल्याने गावातील शांतता भंग होत आहे.तसेच कौटुंबिक वाद सुद्धा उद्भवत असुन गावातील अनेक संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे.यामुळे येथील महिला सरपंच नीता कुमरे यांच्या नेतृत्वात गावातील महिला मंडळांनी थेट मारेगाव पोलिस स्टेशन गाठत गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली.येत्या चार दिवसांत त्या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास चक्क पोलीस स्टेशन समोर आपल्या कुटूंबासह उपोषण करण्याचा ईशाराही उपस्थित महिलां मंडळांनी दिला आहे.


यावेळी हटवांजरीच्या महिला सरपंच नीता तुकाराम कुमरे,ताईबाई येवले, रेखा शेंडे, लीला आत्राम,बेबी रामपूरे,शांता आत्राम,सुशील मडावी,आशा भोयर,रेखा आत्राम, कमला टेकाम,आशा दानव,लता दूधकोहळे,वंदना राऊत,तारा चिकटे, वंदना मडावी,मनाबाई सपाट,अस्मिता भोयर, रेखा कालेकर,आदी उपस्थित होते.




