Ajay Kandewar,Wani:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्याकरिता वणीत होत असलेल्या सभेची तयारी सुरू झाली असून, उबाठा पक्षाचे अधीकृत उमेदवार संजय देरकर व महाविकास आघाडीमधील नेत्यांना सभेचे आमंत्रण देण्यात येत आहे. दरम्यान, सोमवार ११ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ११ वाजता वणी येथील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात जाहीर सभा होणार आहे. या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय देरकर यांनी महाविकास आघाडीतर्फे केलें आहे.