•सामाजिक जाणिवेतून संजय देरकरांचा‘वाढदिवस’ साजरा
अजय कंडेवार,वणी :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, वणी नागरी सह.पतसंस्थेचे अध्यक्ष संजय देरकर यांचा वाढदिवस 17 जाने.रोजी निवासस्थानी सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे संजय देरकर यांनी कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा न करता कार्यकर्ते,सवंगळी व परिवारासोबत अत्यंत साध्यापणाने आपला वाढदिवस साजरा केला.तसेच सामाजिक जाणिवेतून शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आशा वर्कर्स , विधवांना साळी चोळी,गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप व भारतीय संस्कृती जपत पत्रकार ,डॉक्टर,जेष्ठ शिवसैनिक यांना शॉल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही संजय देरकर यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीचा शुभेच्छाही देण्यात आल्या. भाऊनी सामाजिक भान जपल्याने त्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहणारे हेच आमचे एकमेव “संजू भाऊ ” असा आवाज सामान्य माणसाकडून ऐकू येत आहे.