•जो खुद के घर का नहीं हो सका…. वो जनता का कैसे होगा यावरूनच होणार गावात मतदान.
•गावामध्ये कधी तोंड न दाखवणारे नेते व कार्यकर्ते सज्ज.
•”मेरा सुबह का धंदा चलेगा अपना सरपंच आया तो” अशी एका ग्रामीण हॉटेल व्यवसायकाची आशा….
अजय कंडेवार,वणी :- ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यापासून राजकीय वातावरण तापत आहे. सरपंचपदासाठी राजकीय गप्पा रंगताना दिसून येत आहे. सर्व राजकीय पक्ष आपापली ताकत यामध्ये वापरताना दिसून येत आहे. सरपंच थेट जनतेमधून असल्यामुळे चांगला उमेदवार कोण? याकडे सर्वाधिक लक्ष लागलेले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चांगलीच मोर्चेबांधणी होताना दिसून येत आहे.
ग्रामपंचायतवर आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. तसेच चांगला उमेदवार कोण आहे. हे पाहण्यासाठी धडपड सुरू आहे. तसेच जनतेतील उमेदवार कोण हे निवडण्यासाठी आजी-माजी नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसून येत आहे. तसेच ग्रामपंचायतवर आपलाच झेंडा लागावा यासाठी गावातील बैठकांना तसेच चर्चाना उधाण आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकामुळे गावागावातील वातावरण तापताना दिसून येत आहे.
तसेच गावामध्ये कधी तोंड दाखवणारे नेते व कार्यकर्ते आता गावामध्ये वावरताना दिसुन येत आहे. निवडुन दिलेला सरपंप एकनिष्ठ असावा. याचा सुध्या विचार केला जात आहे. मोबाइलच्या रिचार्जची मागणी एकदम वाढली आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी जास्त कस लागत आहे. निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
•जो खुद के घर का नहीं हो सका…. वो जनता का कैसे होगा यावरूनच होणार गावात मतदान होंनार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. गावामध्ये कधी तोंड न दाखवणारे नेते व कार्यकर्ते सज्ज झाल्याचे गावात बोलल्या जाात आहे.”मेरा सुबह का धंधा चलेगा, अपना सरपंच आया तो……” अशी एका ग्रामीण हॉटेल व्यवसायकाची आशा जागृत झाली आहे.