•बीट जमादराची मजा, गावकऱ्यांची सजा.
•अवैध दारू विक्री बंद करा ,अन्यथा…
अजय कंडेवार,वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिवणी (जहा) येथे मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री होत असल्याने या गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावली असून, अनेक गोरगरीब महिलांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी अवैध दारू विक्री विरोधात स्वतः सरपंचासह शेकडो महिलांनी एल्गार पुकारून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिस उपविभागीय अधिकार्यांसह इतरांना निवेदने ता .5 फेब्रुवारी रोजी देऊन अवगत सुद्धा केले आहे.
निवेदनानुसार शिवणी (जहा) येथे 2 जणांकडून illegal liquor sale अवैध दारू विक्री केल्या जात असून, संबंधित बीट जमादार यांना अभय देत असल्याचे सरपंचाचे स्पष्ट आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे या गावात दारूचा सुळसुळाट झाला असून, विद्यार्थी व युवक व्यसनाधीनतेच्या वाटेवर जात आहे. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था सुद्धा भंग झाली आहे. शिवाय गोरगरीब महिलांचे संसार देखील उघड्यावर आल्याने या गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी येथील महिला गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये निवेदने देऊन दारूबंदी करण्यासंदर्भात पोलिसांना अनेकदा कागदोपत्री विनंती केली आहे.
परंतु काही काळ उलटला व विषय मागे पडल्यानंतर पुनश्च दारू विक्री सुरू होते. याचा अर्थ असा की “बीट जमादार मस्त…. बाकी सब स्वस्त…”अशीच अवस्था गावची झाली आहे. पाहिजे तशी कारवाई झाली नसल्याने या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत असून या अगोदरही आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी illegal liquor sale दारूबंदी करण्याचे आश्वासन दिल्याने आक्रमक महिलांनी आंदोलन स्थगित केले होते.गावातील दारू विक्री बंद व्हावी यासाठी गावात अवैध व्यवसाय करणार्या लोकांची इत्थंभूत माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिली.. या नंतरही गावातील अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर पोलीस स्टेशन कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे शिवणी (जहा)येथील सरपंचासहित महिलांनी प्रत्यक्ष Dysp यांच्याशी चर्चेत महिलांनी दिला.यावेळी सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील व शकडो गावतील महिला उपस्थित होते.