अजय कंडेवार,वणी:-अपघाताच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. अस्ताव्यस्त वाहतूक याला कारणीभूत ठरताहेत. मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या यात 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला आहे
सुनंदा या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी होत्या. त्या दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा गौरव रामटेके (27) यांच्या सोबत स्प्लेंडर या दुचाकीने (Mh 34 BQ 3609) पांढरकवडा येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. आज मंगळवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्या मुलासह गावी परत चालल्या होत्या. तर किशोर सुरेश गेडाम (34) हा धोपटाळा येथील रहिवासी आहे. तो त्याच्या स्प्लेंडर या दुचाकीने (MH29 BZ 3805) कामानिमित्त लालपुलिया परिसरात चालला होता.
11.30 वाजताच्या सुमारास लालपुलिया परिसरातील कळमणा फाट्याजवळ किशोर यु टर्न घेत होता. त्याच वेळी गौरव हा दुचाकीने जात होता. दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरा समोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की मागे बसलेल्या सुनंदा या उचळून डिव्हायडरवर पडल्या. डिव्हायडरवर त्यांचे डोके आदळले गेले. ब्रेन इन्ज्युरी आणि रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गौरव हा जखमी झाला. तर दुस-या दुचाकीचा चालक किशोर हा देखील जखमी झाला. दोघांच्याही डोक्याला मार लागला. घटनास्थळावरील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.