•तहसीलदारास निवेदन
•सेनेचा 20 सप्टेंबर पासून आंदोलनाचा ईशारा
नागेश रायपूरे, मारेगाव:- तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमूळे,शेतातील उभे पीक पाण्याखाली आल्याने अतोनात नुकसान झाले.तालुक्यात तिबार पेरणीची वेळ आली असतांना सुद्धा प्रशासनाकडून आतापर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तत्काळ आर्थिक मदत करा.या प्रमुख मागणीसाठी शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले.न दिल्यास येत्या 20 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनाचा ईशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे पुर परस्तीती निर्माण झाली. तालुक्यात हजारो हेक्टरवर शेतजमिनी पाण्याखाली येवून शेताला तलावाचे रूप आले.यामुळे शेतातील उभे पीक खरडून गेल्याने पिकाची अतोनात नुकसान झाली.शेतकऱ्यांवर चक्क तिबार पेरणीची वेळ आली असतांना सुद्धा नुकसानभरपाईची कुठलीच मदत प्रशासनाकडून मिळाली नसल्याने शेतकरी बांधव मोठया आर्थिक अडचणीत सापडल्याचे भयाण वास्तव निर्माण झाले आहे.अतिवृष्टी जाहीर करुन ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसल्याने तत्काळ मदतीच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या 20 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी सेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी,युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की,उपसरपंच गजानन ठाकरे,सुनील गेडाम,श्रीकांत सांबजवार,किसन मत्ते,सुरेश पारखी,विकास बोबडे, सारंग काळे,नितीन पिंपळशेंडे,आदी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.