वणी | Vidarbh News Desk : राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर समाजासाठी झटणारी संवेदनशील बांधिलकी असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शेतकरी व कामगार नेते तथा संजय खाडे. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, शेतकरी व कामगारांच्या अडचणींना स्वतःच्या कुटुंबाचा प्रश्न मानून लढणारे संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा देखील सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून, त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे.
शनिवार, २३ मे रोजी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता शेतकरी मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून आयोजित हा उपक्रम अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.त्यानंतर दुपारच्या सत्रात येथील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फळे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती असलेली आत्मीयता आणि माणुसकीची भावना या उपक्रमातून अधोरेखित होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
संध्याकाळी ६ वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते एका नव्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे, संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे हे या कार्यालयाचे संचालक असून, नव्या पिढीतही सामाजिक कार्याची परंपरा पुढे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून संजय खाडे यांनी शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. आंदोलन असो, सामाजिक मदत असो किंवा विकासाच्या प्रश्नांसाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा प्रत्येक ठिकाणी त्यांची सक्रिय भूमिका दिसून आली आहे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस हा केवळ राजकीय कार्यकर्त्यांसाठी नव्हे, तर समाजातील अनेक घटकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.सामाजिक जाणीव, जनतेप्रती असलेली नाळ आणि सेवाभावी वृत्ती यामुळे संजय खाडे हे नाव आज अनेकांच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “नेतृत्व असेच असावे”

