Ajay Kandewar,Wani:- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांवरील विश्वास प्रकट केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने विजय चोरडिया यांची शिवसेना जिल्हा संघटक पदी (कार्यक्षेत्र यवतमाळ,वणी व राळेगाव विधानसभा) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या नियुक्तिपत्रावर पक्षाचे सचिव संजय पुष्पलता भास्कर मोरे यांच्या स्वाक्षरी असून, ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी वैध असेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.पत्रात नमूद करण्यात आले आहे की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनुसार व धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे कार्यरत राहून विजय चोरडिया यांनी सक्रियपणे पक्षाचा प्रचार व प्रसार करावा, तसेच शिवसेना पक्ष बळकटीसाठी सर्वांशी एकजूट ठेवून कार्य करावे,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.या नियुक्तीमुळे यवतमाळ,वणी व राळेगाव विधानसभा परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती महत्वाची ठरणार आहे.

