Tuesday, February 17, 2026
HomeUncategorizedवणी शहरात निर्भय चोरट्यांची दादागिरी......

वणी शहरात निर्भय चोरट्यांची दादागिरी……

•चोरट्यांचा वणी पोलीस विभागाला थेट ‘चॅलेंज’! •सीसीटीव्ही समोरच पान टपरी फोडली.

Ajay Kandewar, Wani : वणीच्या मध्यभागी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णांकित पुतळ्यासमोर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण शहर हादरले आहे. भर चौकात, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसमोरच एका बेरोजगार गरीबाची “अमोल टी अँड पान कॉर्नर” ही टपरी आहे.याच पान टपरीला अज्ञात चोरट्यांनी फोडून 15 ते 20 हजार रुपयांचा मुद्देमाल सरळ लंपास केला. अशी विश्वसनीय माहिती मिळाली.

ता.7 डिसेंबर रोजी सकाळचा दरम्यान ही घटना समोर आली आणि त्यानंतर शहरात एकच चर्चा सुरू आहे.चोरट्यांना पोलीसांची भीती उरलीच नाही का?ज्या ठिकाणी दिवस-रात्र गजबज,सतत वाहतूक आणि प्रत्येक कोपऱ्यावर सीसीटीव्ही…तर सोडाच थेट दुकानासमोर मध्यभागी मोठ मोठे CCTV कॅमेरे लागलेले आहे.तिथेच चोरट्यांनी अशी हिमत दाखवून केलेली दुकानफोड म्हणजे वणी पोलिसांना थेट उघड चॅलेंज असल्याचे सर्वांचा मत. चोरट्यांना जणू संदेश द्यायचं असेल की “कॅमेरे असो वा पोलीस… आम्ही थांबणार नाही”.

अमोल रमेश मडावी यांनी माहिती दिली की अद्यापही तक्रार प्रक्रियेत पोलिसांनी घेतली नाही तरी,प्रश्न कायम आहे.मध्यवर्ती भागात अशी निर्भय चोरी होत असताना पोलिसांची तातडीची कारवाई कुठे?काही दिवसांपूर्वीच शहरातील घरफोडीचा तपास LCB आणि DB पथकाने लावला होता.तरीही चोरी आणि दुकानफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.हे प्रकरण फक्त दुकानफोडी नाही.हे कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान आहे.ही घटना शहरातील मोठी नाही शंका परंतु अज्ञात चोरट्यांची दहशत निर्माण करणारी असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments