Ajay kandewar,Wani:- शहरातील अनेक हॉटेल्समध्ये OYO रूम्सच्या नावाखाली अनधिकृतरीत्या चालणाऱ्या धंद्याने चांगलाच उच्छाद मांडला आहे. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा वावर वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

यावरून स्पष्ट होते की, नेते आणि सामाजिक संघटना मौन बाळगत आहेत का? असा प्रश्न शहरात चर्चेत आहे.या सगळ्या प्रकारामुळे शहराचे चारित्र्य धुळीस मिळत असून भावी पिढी धोकादायक मार्गावर वळत आहे.सामाजिक संघटना, पालक व सजग नागरिकांमध्ये संताप असून त्यांनी तातडीने राजकीय आणि सामाजिक पुढाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी केली आहे अन्यथा, “आजचा निष्काळजीपणा उद्या शहराच्या संस्कृतीवर तुटून पडेल” अशी भीती व्यक्त केली जात आहे.शहरातील अनेक ठिकाणी तर अल्पवयीन विद्यार्थीवर्ग रात्री या खोलींमध्ये वेळ घालवताना दिसतात, ही बाब अतिशय गंभीर आहे.
वणीच्या वाघदरा येथील प्रकरण व यवतमाळ रोडवरील एका बार समोर नांदेपेरा रोडवर, गांधी चौकातून मध्यभागी,नंदिनी बार समोरील हॉटेल ,गणेशपूर हद्दीतील असलेल्या हॉटेल च्या याबाबत मागील वृत्तपत्रात देखील बातमी प्रकाशित झाली तरीही प्रशासन कानडोळा करताना दिसत आहे.या अनधिकृत OYO प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की,प्रशासन झोपले आहे, नेते मौन आहेत आणि समाज धोक्याच्या दरीत उभा आहे.या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही तर, आजचे मौन उद्याचे मोठे पाप ठरणार आहे.

