Friday, April 24, 2026
HomeBreaking Newsशिंदे गटाचा दमदार निर्णय वणीला मिळाला ‘ढाण्या वाघ’.....

शिंदे गटाचा दमदार निर्णय वणीला मिळाला ‘ढाण्या वाघ’…..

•तालुका प्रमुखपदी प्रसाद ठाकरे. •जनतेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठा सन्मान.

Ajay kandewar,Wani : वणी तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय घेत शिवसेना (शिंदे गट) ने प्रसाद ठाकरे यांची वणी तालुका प्रमुखपदी निवड केली आहे. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रसाद ठाकरे हे आपल्या कार्यतत्परतेसाठी, ठाम भूमिका आणि जनसंपर्कासाठी ओळखले जातात. “ढाण्या वाघा”सारखा दमदार नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुप्पट झाला आहे.या निवडीमुळे वणी तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) अधिक संघटित आणि आक्रमक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे विरोधकांच्या कपाळावर आठ्या उमटण्यास सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे आयोजित कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रसाद ठाकरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सन्मानामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, तालुक्यात शिंदे गटाची ताकद अधिक प्रभावीपणे दिसून येत आहे.

•माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे खंदे व विश्वासू समर्थक…..

विशेष म्हणजे प्रसाद ठाकरे यांची ख्याती ही माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे खंदे व विश्वासू समर्थक म्हणून आहे. नांदेकरांच्या नेतृत्वातील प्रत्येक चळवळ, प्रत्येक जनआंदोलन आणि लोकहिताच्या उपक्रमात ठाकरे आघाडीवर राहिले आहेत.त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे आणि निष्ठेमुळेच त्यांना वणी तालुका प्रमुखपदी निवड देऊन शिंदे गटाने योग्य व्यक्तीला योग्य जागा दिली, असे कार्यकर्ते सांगतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page