Ajay Kandewar,Wani:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. सहा महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा यावेळी टक्का वाढल्याचे दिसून आले आहे. अखेरच्या काही तासांता मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळाले. या निवडणुकीत चौरंगी लढत झाल्याची चर्चा होती, मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर विरुद्ध भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यातच थेट लढत दिसुन आली. आघाडी वर्सेस महायुती एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने बिग फाइट म्हणून या लढतीकडे पाहिले जाते. त्यामुळे वणी विधानसभेचे लक्ष येथील निकालाकडे लागले आहे.
संजय देरकर यांनीही चार टर्म निवडणूक लढवली, तर बोदकुरवार दोन वेळा आमदार राहिले. पक्ष, सामाजिकपातळीवरही नेतृत्व सिद्ध केले आहे. कसलेले नेते आणि एवढ्या वर्षांच्या राजकीय अनुभवातून दोन्ही बाजूंकडून ताकदीने निवडणूक लढविण्यात आली. डोअर टू डोअर भेटी, छोट्या- मोठ्या सभा, वेगवेगळे प्रचार साहित्य, पक्षाची यंत्रणा राबविली, डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व आयुधांचा वापर करण्यात आला.
या सर्व रणधुमाळीनंतर आता निकालाच्या चर्चा रंगल्या आहेत. या ठिकाणी कुणबी, आदिवासी समाजाच्या मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आधारावर सरळसरळ सामाजिक, धार्मिक विभागणी करून विविध समीकरणांचे आकडे बांधले जातआहेत.तरीही संजय देरकर यांच्या एक्झीटपोल मध्येही संभाव्य आमदार म्हणुन दिसुन येत आहे. यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात जोमात चर्चा सूरू आहे