अजय कंडेवार,Wani:- वणी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत आघाडीने कमळ काढून मशाल पेटविली आहे. याठिकाणी आघाडीचे सेनेचे उमेदवार संजय देरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. याठिकाणी भाजपा उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव केला आहे. गेल्या दहा वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता. आता पुन्हा हा मतदारसंघ महाविकास आघाडीला खेचण्यास संजय देरकर यांना मोठे यश आले आहे.
सुरूवातीचा फेरीपासूनच फक्त दोनच उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली होती. संजय देरकर यांच्यासाठी शिवसेना प्रमूख उध्दव ठाकरे यांची सभा देखील पार पडली होती. त्यात मविआ चे सर्वच नेत्यांनी संजय देरकर यांचा मोठा प्रचार केला होता. त्यात आता संजय देरकर हे वणीतून पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे वणीत आता मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.दरम्यान, 23व्या फेरी अखेर संजय देरकर यांनी 13250 मतांनी आघाडी घेत वणीत मशाल पेटविली
.