Ajay kandewar,Wani:- स्थानिक निवडणुकीच्या उंबरठ्यावर वणी तालुक्यात भाजपाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. अनेक भाजप युवकांनी अचानकपणे शिंदे सेनेत जंगी प्रवेश करत राजकीय वातावरण ढवळून काढले. विशेष म्हणजे, या प्रवेशाचे नेतृत्व माजी भाजप युवा कार्यकर्ता निखिल खाडे यांनी केल्याने भाजपच्या स्थानिक संघटनेत खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.निखिलमुळे वणी विधानसभा निवडणुकीत ओबीसी नाराजीचा परिणाम “भाजपाला सहन” करावा लागला.
आता त्या संदर्भातील “गेमचेंजर युवक निखिल खाडे यांनी स्वतःसोबत कार्यरत असलेल्या अनेक तरुणांना घेऊन शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपची युवा फळी अक्षरशः रिकामी झाल्याची चर्चा आहे. हे सर्व युवक जवळपास माजी नगराध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या जवळचे आणि हे निवडणुकीच्या वेळी विजय चोरडिया यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जंगी प्रवेश केल्याने वणी भाजप गोट्यात नेमकं काय शिजत आहे? हे अद्यापही कोणाला कळत नाही परंतु हे तर शंभर टक्के सत्य झालेले आहे की, भाजपा मध्ये एक नाराज गट थेट शिंदे सेनेत प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांना विजय चोरडिया यांचे नेतृत्व आवडत असल्याचे स्पष्ट म्हणणे आहे. नगरपरिषद निवडणुकीत वणीतील समीकरणे नाजूक असताना, तारेंद्र बोर्डे यांच्या जवळीक मानला जाणारा युवा गट “निखिल गटाचा” अचानक झालेला हा प्रवेश भाजपासाठी राजकीय आघात ठरू शकतो.वणीच्या राजकारणातील या हलचालीमुळे भाजप विरुद्ध शिंदे गटाचे युद्ध आता थेट ‘युवा फळी’वर केंद्रित होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.निखिल खाडे व भाजप नाराज युवक एक गट यांच्या प्रवेशाने शिंदे गटात उत्साह वाढला असून, आगामी निवडणुकीत हा गट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार अशी चर्चा राजकीय कट्ट्यांवर रंगली आहे.
ओबीसी प्रकरणातील ‘त्या’ घटनेची पुन्हा चर्चा….
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला मुद्दा की विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या संपर्क कार्यालयात वणी विधानसभा निवडणूकित “ओबीसीशी संबंधित वादग्रस्त घटना”स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी ज्या युवकाला “अवमानास्पद भाषेचा”सामना करावा लागला, तोच युवक म्हणजे निखिल खाडे.आता त्याच निखिल खाडे यांनी भाजपाची युवा फळी सोडून शिंदे सेनेत अनेक युवकांनी प्रवेश घेतल्याने जुना जखमी विषय पुन्हा जागा झाल्याचे मत आहे.

