अजय कंडेवार,वणी:- जनता विद्यालय वणी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ता. 23 जाने. रोज मंगळवारला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग नोंदवला.

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले . कार्यक्रमाच्या अध्यक्ष जोगी मॅडम मुख्याध्यापक जनता विद्यालय वणी यांनी “तुम्ह मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा ” नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वाक्याची आठवण करून स्वतंत्र भारताचे स्वप्न बघणाऱ्या वीरांची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली.

प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक बोबडे सर , पर्यवेक्षक आसुटकर सर, तसेच वैष्णवी वाढई,श्रुती जूनगरी,मंजिरी चटप,आकांक्षा ओझा,अनुष्का चिडे, आकांक्षा भोंगळे,सुरभी दाढे यांनी स्वागत गीत आणि वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला .झाडे सर, पोडे सर ,जीवतोडे मॅडम, सरमोकदम मॅडम या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मत्ते सर व सूत्रसंचालन झाडे सर आणि आभार प्रदर्शन देवाळकर सर यांनी केले

