अजय कंडेवार,वणी:– शिरपुर आबई फाटा रा.मा -३७४ रस्ता दुरुस्ती व आबई फाटा वायपाईंट वेळोवळी गतीरोधकांची मागणी बांधकाम विभागाला, वणी यांना निवेदकांनी केली. विभागाने होकार देवुन गतीरोधाक उभारले नाही. सां. बा. वि. च्या बेजबाबदार पणामुळे मोठ्या प्रमाणात जिव गेल्यावरही सां. बा.वि. झोपेचे सोंग घेते ही बाब अतिशय गंभिर आहे.WANI PWD department in sleep mode
चारगांव चौकी, शिरपुर, आबई फाटा, शिंदोलर, कळमना हा दोन जिल्ह्यांना जोडणारा यवतमाळ-चंद्रपूर महत्वपुर्ण ३१७ राज्यमार्ग आहे. सोबतच आबई फाटा, कुरई, कोरपना रा.मा. ३७४ हा जुळुन वायपाईंट तयार झाला आहे. परिसरात मोहदा गिट्टी खदान, डोलोमाईंट, कोळसा, सिमेंट इत्यादी खाणी असुन येथील खणीजाची मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र वाहतुक सुरु असते. मागील ३ वर्षात कोरपना कडुन वणी कडे येणारे वाहन, वणी कडुन शिंदोला कडे जाणाऱ्या अतिभार व भरधाव वाहणाला आबई फाटा वायपाईट वर वेग कमी होण्या करीता प्रतिबंध नसल्याने वाहकाचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहे. मागील ३ वर्षात १५ च्या वर नागरीकांना या धोकादायक वायपाईंटवर अपघातात जिव गमवावे लागले सोबतच या वायपाईंटवर पेट्रोलपंप निर्माण झाले असुन त्या वायपाईंटचे चौफुलीत रुपांतर झाले. या ठिकाणी कोणते वाहन कोणीकडून येत आहे याचा अंदाज येत नाही. सतत कोळसा, गिट्टी, सिमेंट मोठे वाहणाची वाहतुक होत असुन दुचाकी धारक व छोटी वाहन यांना जिव मुठीत घेवुन धोकादायक प्रवास असे अपघात प्रवणक्षेत्र तयार झाले आहे. याबाबत परीसरातील ग्राम पंचायत व नागरीकांनी अपघाता नंतर वेळोवळी गतीरोधकांची मागणी बांधकाम विभागाला, वणी यांना केली. विभागाने होकार देवुन गतीरोधाक उभारले नाही. सां. बा. वि. च्या बेजबाबदार पणामुळे मोठ्या प्रमाणात जिव गेल्यावरही सां. बा.वि. झोपेचे सोंग घेते ही बाब अतिशय गंभिर आहे. तसेच शिरपुर ते आबई फाटा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन सर्कस करत चालवावे लागते. पावसामुळे पाणी साचल्याने वाहकांना खड्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत आहे.
या रस्त्यावरुन शिरपुर, कुरई, शिंदोला या ठिकाणी येणारे शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण व दैणदिन प्रवासी या सर्वांनाच नादुरुरत रस्त्यामुळे मनस्ताप सहन करून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सबब विनंती की, अपघाताचे वाढते प्रमाण व नागरीकांना सुरक्षीत प्रवास यांचे गांभीर्य लक्षात घेवुन आबई फाटा वायपाईंट येथे गतीरोधक व शिरपुर आबई फाटा रस्ता दुरुस्ती होणे, नागरीकांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिने अत्यंत गरजेचे आहे. नागरीकांना होणारा त्रास व घडणारे अपघात या बाबीचे गार्भीव लक्षात घ्यावे. नागरीकांमध्ये सा. वा. वि. वणी यांच्या बाबत मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे.