Tuesday, July 14, 2026
HomeBreaking Newsवणीत शिंदेसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा .....

वणीत शिंदेसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा …..

• शिंदे सेनेच्या सत्कार सोहळ्यात गर्जना. • भगवा फडकवण्याचा निर्धार.

Ajay Kandewar,Wani :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने आपली ताकद दाखवून दिली. विविध तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार सोहळा 16 सप्टेंबर रोजी वणी येथील जिनिंग हॉलमध्ये पार पडला. यवतमाळ चंद्रपूर जिल्हा समन्वयक माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा जोश पाहून विरोधकांच्या कपाळावर आठ्या चढल्याशिवाय राहिल्या नाहीत.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ,विश्वास नांदेकरांनी “गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” हा मंत्र दिला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेवर “कायम भगवा फडकला पाहिजे” असा ठाम संदेश देत कार्यकर्त्यांना लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.आगामी निवडणुकांचे रणांगण कसे सजवायचे, याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विश्वासराव नांदेकर यांनी दिलेली गर्जना “शेर अभी बुढा हुआ है मगर शिकार करना छोडा नही” या वाक्यावर क्षणभर सभागृह दणाणून गेले. टाळ्यांच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून विरोधकांच्या गोटात चिंतेची लाट पसरली आहे.

 

सत्कार सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे, विधानसभा समन्वयक चंद्रकांत घुगुल,वणी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकार, झरी तालुका प्रमुख बाळु चीडे, वणी विभाग प्रमुख मिनानाथ काकडे, शांताराम बोढाले,वणी शहर प्रमुख शिवराज पेचे, मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम, झरी शहर प्रमुख नाना सुगंधे, वणी तालुका संघटकसंजय आवारी,मारेगाव तालुका संघटक प्रवीण बलकी, झरी तालुका समन्वयक बंडूभाऊ देवाळकर यांचा समावेश होता. तसेच उपतालुका प्रमुख अनिल उलमाले, अनिल जांभूळकर, राजू खामनकर, लांभेश खाडे, अनिल ढगे, हिमांशु बोहरा, विक्की चवने, राहुल पारखी आदींनाही सन्मानित करण्यात आले.महिला आघाडीतही जोरदार उपस्थिती दिसून आली. उपजिल्हाप्रमुख उज्वला चंदनखेडे,वणी विधानसभा संघटीका संगीता मुरस्कर,वणी तालुका प्रमुख मनिषा कोंगरे, वणी शहर प्रमुख वसुधा ढगे, वणी तालुका संघटीका सीमा आवारी, झरी तालुका प्रमुख शुभांगी लोडे, मारेगाव तालुका प्रमुख कल्पना गावंडे, मारेगाव महिला शहर प्रमुख प्रतिभा झाडे आणि मारेगाव शहर संघटीका उमा देवगडे यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमास आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण सभागृहात घोषणाबाजीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.हा सत्कार सोहळा फक्त पदाधिकाऱ्यांच्या गौरवापुरता मर्यादित न राहता, शिंदे सेनेच्या आगामी निवडणूक रणांगणातील भव्य तयारीचा जाहीरनामा ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page