•प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचेही व्याख्यान
अजय कंडेवार,वणी:– OBC (VJNT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांचे भव्य सत्कार समारंभ व प्रा.ज्ञानेश वाकुडकर जाहीर व्याख्यानाचे आयोजन दि.4 मार्चला वसंत जिनिंग लॉन येथे सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे.
विशेष बाब या कार्यक्रमाची अशी की, सत्कारमुर्ती म्हणून महाराष्ट्र भूषण डॉ. भालचंद्र चोपणे, (माजी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर)तसेच विधानपरिषदेकरिता नवनिर्वाचीत आमदार धिरज लिंगाडे (पदवीधर मतदारसंघ, अमरावती) सुधाकर अडबाले (शिक्षक मतदारसंघ, नागपूर)आणि अभिजित वंजारी(पदवीधर मतदार संघ, नागपूर) यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी ऍड.वामनराव चटप, हे राहणार आहे,तर उद्घाटक म्हणून बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर (खासदार) तर स्वागताध्यक्ष म्हणून संजय खाडे, (अध्यक्ष-रंगनाथ स्वामी अर्बन लिमिटेड) हे असणार आहेत.
तसेच प्रा.ज्ञानेश वाकुडकर,यांचे “जातनिहाय जनगणना आणि OBC(VJ, NT, SBC)आंदोलनाची भूमिका” याविषयावर जाहिर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार ,वणी )सुभाषभाऊ धोटे, प्रतिभा धानोरकर, (आमदार,वरोरा-भद्रावती),वामनराव कासावार(माजी आमदार),विश्वास नांदेकर(माजी आमदार) संजय धोटे,माजी आमदार)अशोक जिवतोडे, राष्ट्रीय समन्वयक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि प्रदिप बोनगिरवार (अध्यक्ष- OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती) हे राहणार आहेत.
तरी वणी-मारेगाव-झरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.