•तो नविन “चेहरा “कोण? शोधण्याचे आवाहन
•अन्न व औषधी प्रशासनाची डोळेझाक का?
अजय कंडेवार,वणी:- शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी आणली आहे. या बंदी असलेल्या तंबाखूची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कायद्याने कारवाई करण्याचे अधिकारी अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. तरीही ते सुस्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असताना येथील वणीत “एका फंक्शन हॉल” जवळील बैठ्या दुकानातच या प्रतिबंधित तंबाखूची दुकानातूनच सर्रास विक्री सुरू आहे,असे त्या परिसरात बोलल्या जात आहे. याकडे मात्र या FDI विभागाचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोपही केल्या जात आहे..
या दुर्लक्षाचे कारण मात्र समजण्यापलीकडचे आहे. आरोग्याची काळजी म्हणून या शासनाने नियम अधिक कठोर केले होते. या तंबाखूची विक्री होणे अपेक्षित नसताना वणीत खुलेआम त्याची विक्री सुरू आहे.याची माहिती या विभागाला नाही असेही नाही. माहिती असतांना त्याच्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे.पान मटेरिअल व स्पेशल सुगंधित तंबाखू सप्लाय जास्त प्रमाणांत याच बैठ्या दुकानातून होत आहेत व या दुकानदाराचा मुख्य अड्डा (गोदाम) हा एका कॉलोनीत असल्याचेही बोलल्या जात आहे. यात मोठी काही दुकाने देखिल आहेत. येथे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या तंबाखूचा पुरवठा होता. असेही खमंग चर्चा सुरू आहे. असाच पुरवठा करण्याचा “तो नविन चेहरा गुटखा क्षेत्रातील मुख्य डॉन ” बनण्याचा मागावर असल्याचे बोलल्या जाते. पण याला पाठबळ कुणाचे? या दुकानातून सप्लाय करत असल्याचे प्रशासनाला का दिसत नाही आहे. यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनासह पोलिस विभागाकडूनही कारवाई होणे अपेक्षित आहे. पण यावर येत्या काही दिवसातच पुरव्यासहीत खुलासाही होईल यात शंकाही नाहीं.