Friday, June 12, 2026
HomeBreaking Newsवणीत आता लावून दाखवा बुलेटला "ढग... ढग.. ढग...!

वणीत आता लावून दाखवा बुलेटला “ढग… ढग.. ढग…!

•वाहतूक पोलिस "फटाके" काढणार.

Ajay Kandewar,Wani:- शहरात “ढग-ढग-ढग” करत कानठळ्या बसवणाऱ्या बुलेटचालकांना आता वणी वाहतूक पोलिसांनी ब्रेक लावला आहे! सणासुदीच्या दिवसांत जिथे दिवाळीचे फटाके हवेत उडतात, तिथे रस्त्यावर फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या सायलेन्सरवाल्या बुलेट्सवर  वणी वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. विशेष मोठी कारवाई करण्याची सूचना देखील दिलेले आहे.

रस्त्यावर चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या कर्कश आवाजामुळे कायम त्रास सहन करावा लागत होता. अचानक मागून “ढग-ढग” करत धावणाऱ्या बुलेटमुळे अनेकदा अपघातासारखी परिस्थिती निर्माण होत होती. यावरच आता वणी वाहतूक विभागाने कठोर पाऊल उचलले आहे.एपीआय महाले यांच्या नेतृत्वाखालील वाहतूक शाखेने शहरातील अशा बुलेटधारकांवर कारवाई करत कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त केले आहेत. मूळ कंपनीचे सायलेन्सर बसविल्यानंतरच त्या बुलेट्सना परवानगी देण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून दंड आकारण्यात येत असून, ही मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी गोपाल हेपट व वाहतूक कर्मचारी टीम करत आहे.

वणी वाहतूक शाखाप्रमुख एपीआय महाले यांचे आवाहन….

वणी वाहतूक शाखाप्रमुख एपीआय महाले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, शहरात कोणीही पुन्हा असा कर्कश सायलेन्सर लावून रस्त्यावर येऊ नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.या कारवाईनंतर शहरात शांतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालक वर्ग व नागरिकांकडून वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेचं जोरदार स्वागत होत आहे. 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page