Ajay,Wani : शहरात सोशल मीडियावर लाल “रंग” असा भयंकर स्टोरी तसेच कॅप्शन ‘307‘असा उल्लेख असलेली एक गूढ पोस्ट सध्या वणी शहरात वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे शहरातील युवकांसह नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, स्टोरी पोस्टमागील नेमका उद्देश काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा पोस्ट एका कथित नगरसेवकाचा “आप्त संबंधाने” ही स्टोरी ठेवल्याच असे सुद्धा बोलल्या जात आहे.
पोस्टमध्ये कोणताही स्पष्ट संदर्भ नसतानाही तिची मांडणी, लाल “रंग”असा भयंकर वापर आणि कलम ३०७ या सांकेतिक स्वरूपामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही पोस्ट केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी प्रसारित करण्यात आली आहे की, तिच्यामागे अन्य काही उद्देश आहे, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, अशा प्रकारच्या संदिग्ध आणि सांकेतिक पोस्टमुळे अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनावश्यक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या” रंग ” चा पोस्टचा उगम, ती प्रथम कोणी प्रसारित केली, तिचा हेतू काय आहे आणि त्यामागे कोणतेही गैरकृत्य किंवा कायद्याचे उल्लंघन तर नाही ना, याची पडताळणी पोलीस प्रशासनाने करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पथक तसेच वणी डीबी पथकाने या व्हायरल पोस्टची दखल घेऊन तांत्रिक तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोशल मीडियाचा वापर करून कोणत्याही प्रकारची भीती, संभ्रम किंवा दिशाभूल निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याची वेळीच दखल घेणे ही कायदा अंमलबजावणी यंत्रणांची जबाबदारी आहे.वणी पोलीस प्रशासनाने तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.![]()
![]()
![]()

