अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील राजूर येथे असलेल्या शहीद भगतसिंग चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला शिक्षिका छाया काटकर व शंकर हिकरे यांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमात कॉ. कुमार मोहरमपुरी,छाया काटकर, महेश लिपटे व राजेंद्र पुडके यांनी आपले विचार मांडले तसेच पुडके यांनी गीते सुद्धा सादर केली.
यावेळी बंडू ठमके, संजय कवाडे, संजय काटकर, साजिद खान, गौतम कवाडे, वर्मा काका, ओम पवार, ऍड.अरविंद सिडाम, दिशा पाटील, अमर फुलझेले, वर्षा सिडाम, अशफाक अली, राजेश मानवटकर, शांताराम फुलझेले, संतोष गेडाम, अमित करमरकर, जाबिर अली, शेख साबीर, संजय पाटील, कवडू करमरकर, सिनु कलवलवार, सागर नगराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.