Accident News…अजय कंडेवार,Wani :- येथील पतसंस्थेची दैनंदिन निधी जमा करणारा 54 वर्षीय एजेंट राजेश उर्फ राजू पुण्यानी चा उभ्या दुचाकीला गुरुवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात कारने जबर धडक दिल्याची घटना घडली.
राजेश नरसिंग पुण्यानी 54 रा.वणी, जि.यवतमाळ हे शहरातील तसेच राजूर, मारेगाव या भागात पतसंस्थाची दैनंदिन निधी गोळा करण्यासाठी अभिकर्ता म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे गुरूवारी राजूर, वणी येथील खातेदारांची जमा रक्कम गोळा करून मारेगाव कडे जात असताना मांगरुळ या गावाजवळ रस्त्याचा कडेला थांबला असता मागच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात कारने उभ्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात तो खाली पडला असता गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरून वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले.नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करुन उपचार सूरू करण्यात आले असता उपचारांदरम्यान त्यात राजेशचा रात्रीच मृत्यू झाला. राजेशच्या अकाली जाण्याने मित्र परिवारासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेशच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिणी, व बराच मोठा आप्तपरिवार आहे.