Thursday, September 24, 2026
HomeUncategorizedराजूर ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी बी. एन. जाधव.....

राजूर ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी बी. एन. जाधव…..

Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या राजूर ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी पंचायत समिती वणी येथील विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी बी. एन. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत किंवा सहा महिने, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. राजूरसोबतच भांदेवाडा, राजूर-निंबाळा रोड, पळसोनी आणि घोंसा, सोनेगाव , वाघदरा, मारेगाव (को), सुकनेगाव, पिंपळगाव आणि उकनी या ग्रामपंचायतींचीही प्रशासकीय जबाबदारी जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पंचायत समिती वणीमध्ये कर्तव्यदक्ष आणि जबाबदारीने काम करणारे अधिकारी म्हणून बी. एन. जाधव यांची विशेष ओळख आहे. त्यामुळे राजूरसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीची प्रशासकीय धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरील वरिष्ठांचा विश्वास अधोरेखित झाला आहे. प्रशासक म्हणून त्यांच्याकडे सरपंच व कार्यकारिणीचे अधिकार राहणार असले तरी शासन आदेशानुसार ग्रामपंचायतीचे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. तसेच प्रशासकीय काळात कोणतीही अनियमितता अथवा अपहार झाल्यास त्यासाठी प्रशासकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे राजूरसह ११ ग्रामपंचायतींचा कारभार नियमबद्ध, पारदर्शक आणि प्रभावीपणे हाताळण्याचे मोठे आव्हान जाधव यांच्यासमोर असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page