Ajay,Wani:- वणी–यवतमाळ मुख्य मार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाढती वर्दळ, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्यावर सांडणारा कोळसा आणि अपुऱ्या सुरक्षा सुविधांमुळे वाहनचालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याची बाब ‘लढा’ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खानझोडे यांनी वणी PWD चे उपअभियंताना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
संबंधित मार्गावर मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत असल्याने अनेक अवजड वाहनांमधून कोळसा व इतर साहित्य रस्त्यावर सांडत असून त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढत आहे. तसेच अपघातप्रवण क्षेत्राची पूर्वसूचना देणारे दिशादर्शक फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रिफ्लेक्टर, कॅट आय, रंबल स्ट्रिप्स किंवा स्पीड ब्रेकर यांसारख्या मूलभूत सुरक्षा सुविधांचा अभाव असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने सुरक्षा करावी अशी मागणी ‘लढा’ सामाजिक संघटनेने केली आहे.संघटनाचे प्रमुख प्रवीण खानझोडे,ऍड रुपेश ठाकरे,आशिष रिंगोले,जाफर खान, प्रताप मुन, मनोज ढेंगळे, सुभाष लसंते, रोशन गारपेल्लीवर आकाश दुबे, सुरेश नेहारे उपस्थित होते.

