•आता “किसमे कितना हैं दम्” हेच बघणे महत्वाचे.
अजय कंडेवार,वणी :- क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची १३ वी आवृत्ती सध्या भारतात पार पडत आहे. न्युझीलंडचा दारुण पराभव करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत ऑस्ट्रेलिया संघाची सुद्धा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी निवड झाली. दोन्हीं दमदार आणि प्रसिद्ध संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने कोणाची हार आणि कोणाची जीत होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. दिनांक १९ नोव्हेंबर रोजी गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना रंगणार आहे. तर हा सामना क्रिकेट चाहत्यांना दाखविण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील टिळक चौकामध्ये मोठ्या एलईडी स्क्रीन आणि डीजेच्या सहाय्याने या सामान्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती आहे आणि तसेही मनसे नवनवीन उपक्रम करण्यात अव्वल असतेच यात शंका नाहीच परंतू याच मागावर आणखी पक्ष आल्याचे दिसत आहे.
विश्वचषक सामन्याच्या अंतिम फेरीत भारतीय संघ दाखल झाला ही बाब संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. याचमुळे या सामान्याचे थेट प्रेक्षपन आणि क्रिकेट प्रेमींसाठी आनंद व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणुन भाजपचे तारेंद्र बोर्डे आणि कुणाल चोरडिया यांच्याकडून टिळक चौकामध्ये मोठी एलइडी स्क्रीन लावून हा सामना लाईव्ह करण्यात येणार आहे. तर याच बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी सुद्धा हा सामना वणीकर जनतेला खुल्या जागेवर पाहाता आनंद साजरा करता यावा यासाठी याच ठिकाणीं मोठ मोठ्या एलईडी वॉल, डिजे आणि फटाक्याच्या शाही आतिषबाजीत दाखविणार असल्याचे माहिती सोशल मिडियावरून देण्यात आली. तशी मोठया प्रमाणावर जाहिरातबाजी सुध्दा मनसे कडून करण्यात येतं आहे. मनसे कडून प्रत्येक हिंदू सण, समारंभ व त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात येतात. तर यापूर्वीही भारतीय संघ जेव्हा जेव्हा विजयी झाला तेव्हा तेव्हा मनसेने फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे. त्यामुळे राजकारण विरहित आपली परंपरा चालू ठेवण्यात मनसेचा हा उपक्रम नवखा नाही असे मत वणीकर जनता व्यक्त करत आहे.
क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपणावरून वणीतील दोन राजकीय पक्ष आमने सामने आल्याने वणीकर जनता आता या सामन्याचा आनंद कोणत्या पक्षासोबत घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.