युवासेनेच्या उपतालुका प्रमुख पदी नयन खाडे
नागेश रायपूरे, मारेगाव:- युवासेना तालुका शाखा मारेगाव ची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील कोसारा येथील नयन अंकुश खाडे यांची युवासेनेच्या उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. विशेष करुन नयन च्या मातोश्री सौ.छाया अंकुश खाडे या ग्राम पंचायत कोसारा येथील महिला सरपंचा आहे.
कोसारा येथील नयन अंकुश खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून युवासेनेत एक सच्चा युवासैनिक म्हणून कार्यरत होता.पक्षासी एकनिष्ठ राहुन तो पक्ष वाढीचे काम करत असल्याने त्यांची युवा सेनेच्या उपतालुका प्रमुख पदी तालुका प्रमुख मयुर ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांचे आदेशाने शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा माजी उपसभापती संजय आवारी यांचे मार्गदर्शनात युवासेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे यांचे नेतृत्वात करण्यात आली.नुकतीच नयन ची नियुक्ती युवासेनेच्या उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती झाल्याने तालुक्यातील युवा सैनिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन नयन वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.