Wednesday, July 29, 2026
HomeBreakingयुवासेना जिल्हाप्रमुख पद धोक्यात....?

युवासेना जिल्हाप्रमुख पद धोक्यात….?

Ajay,Wani:- नवनियुक्त युवासेना प्रमुखाबाबत बालिशपणा, कमीअनुभवी,बेशिस्त कामगिरी कामकाजाबाबत काही कार्यकर्त्यांमध्ये आणि युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.नवनियुक्त युवासेना प्रमुखामुळे अपेक्षित नेतृत्वगुण नसल्याची भावना काही युवक कार्यकर्ते व्यक्त करत असून, युवकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि तळागाळातील पक्षसंघटन बळकट करण्याऐवजी बालिशपणा,बेशिस्तपणा होत असल्याने खंत व्यक्त होत आहे.

राजकीय संघटनांचे खरे बळ हे पदाधिकारी नसतात, तर तळागाळातील कार्यकर्ते आणि युवक असतात. जेव्हा याच युवकांमध्ये नाराजीची चर्चा सुरू होते, तेव्हा ती केवळ कुजबुज म्हणून दुर्लक्षित करून चालत नाही. अशा भावना पक्षसंघटनेच्या भवितव्यावर थेट परिणाम करू शकतात. खरंतर वणी विधानसभेत उबाठा गटाला तोड नाही कारण खंबीर नेतृत्व समजले जाणारे आ. संजय देरकर जनतेचा मनात घट्ट बसले आहे परंतु नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुखामुळे त्यांना त्रास सोसावे लागणार ही तर शोकांतिका आहे.वेळीच आ. संजय देरकर यांनी  या गंभीर प्रश्नावर लक्ष वेधले पाहिजे.

जिल्हा पातळीवर संघटनाला अपेक्षित गती, सातत्यपूर्ण उपक्रम, युवकांशी संवाद आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया अधिक मजबूत व्हावी, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. पण जिल्हा प्रमुखाचा बालिशपणामुळे संघटना विस्तार, जनसंपर्क आणि युवकांना सक्रियपणे जोडणारे संबंध सोडून स्वतःच “इतिहास ” बनविण्यात नवनियुक्त जिल्हाप्रमुख पुढाकार घेत निव्वळ तळतळीतपना करत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

कोणत्याही पदाधिकाऱ्याचे मूल्यमापन पदावरून नव्हे, तर त्याच्या कामातून, आचरणातून होत असते. कार्यकर्त्यांचा सन्मान, संघटन कौशल्य, समन्वय, संवाद आणि पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचविण्याची क्षमता या निकषांवर नेतृत्वाची खरी परीक्षा असते. परंतु या सर्व बाबींची नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुखात दिसून येत नाही आहे. उलट जर विचार केला तर उबाठाचे कट्टर नेते तथा जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे शैली मात्र वेगळीच त्यांचे कार्य पक्षासाठी नेहमी तत्पर असते. वरिष्ठांचा आदेशाला कधीही झुगारून कामे आजगत न केल्याची माहीत प्राप्त आहे. त्यांचात सन्मान, संघटन कौशल्य, समन्वय, संवाद आणि पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचविण्याची क्षमता या सर्व गुणाचा समावेश आहे. म्हणून उबाठा गटाचे “खमक्या ” जिल्हाप्रमुख या नावाने जनतेत प्रसिद्ध आहे.परंतु नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुख कमीअनुभव, बेशिस्त व बालिशपणाबद्दल युवकांमध्ये नाराजीचे सुर हेच समोर पक्षाला नुकसान पोहोचवू शकते यात शंका नाही. म्हणून वरिष्ठांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास पक्ष संघटना अधिक मजबूत होईल; अन्यथा कार्यकर्त्यांतील असंतोष भविष्यात मोठे संघटनात्मक आव्हान ठरू शकते.पक्ष संघटना व्यक्तीपेक्षा मोठी असते. जर तळागाळातील कार्यकर्त्यांना आपला आवाज ऐकला जात नाही, अशी भावना निर्माण होत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे ही नेतृत्वाची जबाबदारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page