घात-पात की आत्महत्या?
अजय कंडेवार,वणी:- शहरातील पाटाळा पुलाजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याचा स्थितीत आढळला. ही घटना आज बुधवारला सकाळीं 8 वाजता उघडकीस आली आहे. तेजस विजय मोगरे (वय अंदाजे-20वर्ष ) असे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात ? या मागील कारण अद्यापही कळू शकले नसून याप्रकरणी माजरी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास माजरी पोलिस करीत आहे.

याबाबत असे की, मृतक तेजस विजय मोगरे वय अंदाजे 20 वर्ष हा एक अत्यंत चाणाक्ष व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून युवकामधे सुपरीचीत होता. हा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मागिल परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास राहत होता. त्यांचें वडील पोलिस खात्यात नौकरीवरअशी प्राथमिक माहिती मिळाली. विशेष मृतक तेजस तिथे का गेला? आणि स्वतःहून केलेली कृती अशी नसते अशी खमंग चर्चा आजू बाजुला होत आहे.

आणि जेव्हा तो स्वःता आत्महत्या करीत असतांना तेथील कुणालाच कळले नाही का? आत्म्हत्या जर असेल तर तो स्तब्ध उभा कसा ? शेवटचा टोकाचे पाऊल एका होतकरू तरुणाने असे कसे उचलले ?असे अनेक प्रश्न अनुत्तरीच आहे…. आता हा घात -पात की आत्महत्या शवविश्र्चेदनानंतर कळेलच…..

