Saturday, October 10, 2026
HomeUncategorizedमोहदा सहा वर्षांपासून "पोलीस पाटीलाविना......"

मोहदा सहा वर्षांपासून “पोलीस पाटीलाविना……”

Ajay,Wani : तालुक्यातील मोहदा गावात गेल्या जवळपास सहा वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असल्याने स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा आणि ग्रामसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मायनिंग क्षेत्रातील गाव म्हणून मोहदा येथे विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर माहिती संकलन, पोलिसांशी संपर्क आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम यंत्रणेची गरज अधोरेखित होत आहे. अशा परिस्थितीत महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त राहणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून गावातील दैनंदिन व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही लक्षवेधी बाब ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर मोहदा येथील माजी उपसरपंच सचिन रासेकर यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून पोलीस पाटील नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. गावातील भौगोलिक व औद्योगिक परिस्थितीचा विचार करून नियुक्ती प्रक्रियेला गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनातून मांडले आहे. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन रिक्त पद भरण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे मोहदा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page