Ajay Kandewar,Wani:– वणी विधानसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय देरकर यांचा वणी झरी व मारेगाव परिसरात झंझावाती प्रचार दौरा पार पडला. यावेळी तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने मी निवडणूक लढवत असून मतदारसंघाच्या वैभवात विविध कामांचा भर घालण्यासाठी मी कटिबद्ध असून मतदानरूपी आशीर्वाद राहू द्यावा अशी आर्जव संजय देरकर यांनी मतदारांना केली.
शिवसेना पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असून, मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच वणी विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.