•विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चे आयोजन
नागेश रायपुरे, मारेगाव:- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने युनियनच्या 45 व्या वर्धापन दिना निमित्त आज 13 सप्टेंबर रोजी येथील बदकी भवन येथे सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटक म.रा.वि.वि.कं. मर्या पांढरकवडा चे कार्यकारी अभियंता कटारे साहेब आहे.तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष वि.क्षे. तां.का.यु.चे अमरावती झोन अध्यक्ष डी. एच. बिहाडे हे आहेत.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून युनियन सर्कल उपाध्यक्ष पी.एफ.रासेकर, सर्कल सहसचिव निलेश चिपडे,सर्कल प्रसिद्धी प्रमुख नितीन भोगेकर, तसेच विशेष अतिथी म्हणुन पांढरकवडा चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिश्रा साहेब,नागपूर प्रदेश अध्यक्ष आर.के.सावसाकडे हे उपस्थित राहणार आहे.


परिसरातील तमाम रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.
