•काय चाललय या तालुक्यात.. कधी थांबेल हे सत्र.
माणिक कांबळे /मारेगाव :- शहरात वास्तव्यास असलेल्या एका होतकरू युवकाने गळाफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
शंकर गजभे (27) मारेगाव असे आत्महत्या केलेल्या होतकरू युवकांचे नाव आहे. या होतकरूने 15जुनचे सकाळी 11वाजता आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले असून घटना स्थळ पंचनामा करून मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरणीय तपासणी करिता हलविण्यात आला आहे.या युवकाचे शहरात किराणा दुकान आहे. मात्र या युवकाने टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अस्पष्ट आहे.
मृतकाचे पश्चात आई,वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.या युवकाच्या आत्महत्येने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.