Friday, November 20, 2026
HomeBreakingमारेगावात अप्पर एसपींची ‘एन्ट्री’; ठाणेदाराचा कार्यक्षमतेवर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह...

मारेगावात अप्पर एसपींची ‘एन्ट्री’; ठाणेदाराचा कार्यक्षमतेवर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह…

Ajay Kandewar, Wani:- मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहा वर्षीय चेतन चांदेकरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, हा प्रश्न आता जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. घटनेला 30 दिवस उलटले संपूर्ण उपविभागीय यंत्रणा तपासात असतानाही अद्याप आरोपीचा ठोस सुगावा का लागत नाही? मारेगाव ठाणेदारांना या प्रकरणातील आरोपी शोधण्यात अपयश येत आहे की तपासाची दिशाच भरकटली आहे.संशयितांचा शोध नेमका कुठपर्यंत पोहोचलाआहे की केवळ दिवाळीत घर उजेड आणि मृतकाचा घरी अंधार असे सवाल नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मारेगावात प्रत्यक्ष भेट देऊन तपासाचा आढावा घेतल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

वरिष्ठांची एन्ट्री, मारेगाव ठाणेदारांच्या तपासावर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह….

एखाद्या गंभीर प्रकरणात स्थानिक पोलीस ठाण्याने तपासाची दिशा निश्चित करून आरोपीपर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, एवढी मोठी तपास यंत्रणा कार्यरत असतानाही तपासात निर्णायक प्रगती का दिसत नाही.तपास योग्य दिशेने सुरू आहे की महत्त्वाचे धागेदोरे दुर्लक्षित होत आहेत.या प्रश्नांची उत्तरे आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोधण्याची गरज आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी स्वतः मैदानात उतरून तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. वरिष्ठांना प्रत्यक्ष हस्तक्षेप करावा लागणे ही स्थानिक तपास यंत्रणेसाठी आत्मपरीक्षणाची वेळ असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, याच पोलीस स्टेशन हद्दीतील व्हिस्की जंगल परिसरात तोतया पोलिसांनी दोन वृद्धांना सोन्याचे दागिने लुटल्याची घटना समोर आल्याने मारेगाव ठाण्याचा हद्दीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. एका बाजूला सहा वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तर दुसरीकडे खाकीचा बनाव करून नागरिकांना लुटण्याचे धाडस गुन्हेगार करीत आहेत. मग मारेगाव ठाणेदारांचा गुन्हेगारांवर वचक आहे तरी कुठे.की टीम निव्वळ मोठ्या बोम्या ठोकण्यात व्यस्त दिसत आहे? आरोपी सापडत नाहीत की तपासच योग्य दिशेने जात नाही .आता वरिष्ठ पोलीस प्रशासनाने केवळ आढावा न घेता तपासाची दिशा, आतापर्यंतची निष्पत्ती आणि स्थानिक यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्या सहा वर्षाचा मुलाला तपास करून न्याय मिळवून देण्याचे कार्य “हे जर नवीन ठाणेदार” करत नसेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा नक्कीच अधिकार आहे काय?

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page