Tuesday, November 17, 2026
HomeBreakingSP Saheb....मारेगाव ठाणेदार व टीम यांचा तपास "सपेशल फेल’?

SP Saheb….मारेगाव ठाणेदार व टीम यांचा तपास “सपेशल फेल’?

Ajay Kandewar,Wani:- सहा वर्षांच्या चिमुकल्या चेतन चांदेकरच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात मारेगाव ठाणेदार व टीम यांना अद्याप यश आलेले नाही. घटनेला अनेक दिवस उलटून गेले, तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तैनात असल्याची माहिती आहे, संपूर्ण उपविभागाची पोलीस यंत्रणा कामाला लागली; मात्र अद्याप या प्रकरणाचा ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मग एवढी मोठी पोलिस यंत्रणा नेमके काय करतेय? मारेगाव ठाणेदार या क्लिष्ट प्रकरणाच्या तपासात “स्पेशल फेल” ठरत आहेत का असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण 28 दिवस होत असले तरीही मारेगाव पोलिसांना सुगावाच सापडेना अशी गती या पथकाची झाली आहे. तो चिमुकला बिचारा कुणाच काय वाकड केलं असावं. परंतु त्या नरभक्षकाला पकडणे आता गरजेचे आहे आणि चिमुकल्याला न्याय मिळणे तेवढेच महत्वाचे आहे.

२१ ऑक्टोबर रोजी एकासमारंभातून बेपत्ता झालेल्या चेतनचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला. एका निष्पाप बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं उत्तर आलेलं आहे .त्याला मृत्यूच्या दारात कोणी पोहोचवले? त्याच्यासोबत नेमके काय घडले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. तो सहज एकटा चिमुकला तिथे पोहोचला कसा त्याचा सोबत कोण होत असेल कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, तर तपास मात्र अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे दिसत नाही.विशेष म्हणजे या प्रकरणात तीन-तीन तपास पथके कार्यरत असल्याचे सांगितले जात असताना आणि वरिष्ठ स्तरावरूनही यंत्रणा कामाला लागली असताना तपासाची फलनिष्पत्ती काय, हा खरा प्रश्न आहे. तपासाच्या नावाखाली दिवस पुढे सरकत आहेत; मात्र चिमुकल्याच्या मृत्यूमागचे सत्य अजूनही अंधारात आहे. विशेष म्हणजे वणी उपविभागामध्ये एक ऍक्टिव्ह ठाणेदार म्हणून शिरपूर ठाणेदार यांची विशेष ओळख आहे एपीआय संतोष मनवर व डीबी पथकातील प्रमुख PSI साजिद यांना हा तपास का दिला देण्यात येत नाहीये. हे दोघेही मेहनती आणि अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणारे अधिकारी म्हणून सध्या तरी वणी उपविभागात मध्ये यांचे विशेष नाव आणि विशेष ओळख आहे.म्हणून मारेगाव ठाणेदार यांच्याकडून हा गुन्हा काढून घ्यावे तसेच एस.पी कुमार चिंता यांनी जातीने लक्ष देत या दोघांकडेही धुरा द्यावी किंवा SIT ला नियुक्त करावे अशी ही मागणी केली जात आहे.

मारेगाव ठाणेदारांच्या हातातून तपास नकोच आता ….

मारेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पद्धतीवर आता नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक ठाणेदारांच्या हातातून तपास काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाची फेरतपासणी करून उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब पुन्हा तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या महत्त्वाच्या की चिमुकल्याला न्याय.

एका निष्पाप बालकाचा मृत्यू होऊनही तपासात ठोस प्रगती होत नसेल, तर जबाबदारी निश्चित होणार तरी कधी? कुटुंबीयांचा आक्रोश आणि नागरिकांचा संताप प्रशासनापर्यंत पोहोचत असताना तपासाला अपेक्षित गती का मिळत नाही? अधिकारी बदलले, पथके बदलली किंवा तपासाची दिशा बदलली तरी सत्य बाहेर येणे महत्त्वाचे आहे.

सात दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आंदोलन..

१७ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सात दिवसांच्या आत तपासात ठोस प्रगती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन कुंभा वासियांनी छेडण्याचा इशारा दिला आहे त्यातच लढा संघटना देखील यासाठी सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page