•नाली खुली.. चेंबर गायब,काम अर्धवट.
अजय कंडेवार,वणी:- भारतमाता चौक ते गणेशपूर घाट पर्यंतच्या काँक्रेट रस्त्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आले तेही निकृष्ट दर्जाचे असल्याची लेखी तक्रार माजी नगरसेवक धिरज पाते यांनी केली आहे.Ex-corporator aggressive.and filed a complaint. Drain open..chamber missing, work incomplete.
बांधकाम करतांना त्याची गुणवत्ता तपासली जात नाही निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार होतांना दिसत आहे. असा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.विशेषतः या रस्त्यांचे अर्धवट बांधकाम करण्यात आले. नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.रोडच्या बाजूला असलेली नाली खुल्या स्वरूपात असल्याने त्याला चेंबर देखील नाही.
अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने या रस्त्यावर अपघात होऊ लागले आहेत.दुचाकीस्वारांना मोठ्या स्वरूपाचे अपघातही झाले आहे.याच चौकात मागील अनेक महिन्यांपासून काँक्रेटबाबत माहिती कंत्राटदार यांना सांगण्यात आले तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रतिलिपी प्रशासकिय अधिकारी न. प. वणी, मुख्याधिकारी न. प. वणी,अभियंता बा. का. न. प. वणी,आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांना पाठविण्यात आले आहे.