Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsमाजी आ. बोदकूरवार यांचा "अजेंडा" वेल सेट...

माजी आ. बोदकूरवार यांचा “अजेंडा” वेल सेट…

• नवी टीम राजकीय समीकरण नक्कीच बदलणार. • भाजपचा ताकदित आणखी वाढ.

Ajay Kandewar, Wani:- वणी विधानसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा भाजपाभोवती केंद्रीत होताना दिसत आहे. मागील विधानसभेत चांगली आघाडी राखणारे माजी आमदार बोदकुरवार यांनी आता स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्यांच्या नव्या पावलामुळे भाजपाची ताकद आणखी वाढत असून, वणी शहरातील समीकरणे भाजपाच्या फायद्यात झुकलेली स्पष्ट दिसत आहेत.

विशेष म्हणजे, माजी आमदार बोदकुरवार यांनी कार्यकाळात शहरातील अनेक नागरिकांना चांगल्या प्रकारे वागणूक देत विकासकामांची ठसा उमटवला होता. या कार्यपद्धतीचा परिणाम येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये निश्चितपणे दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.मागील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार माजी आमदार बोदकुरवार यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, विरोधकांनी ताशेरे उडवली; तरीही निकालात वणी शहर भाजपाच्याच आघाडीवर राहिले. याच अनुभवावर भाजपाचे नेते आगामी निवडणुकांमध्ये आणखी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. कारण माजी आमदाराने शहरात व ग्रामीण भागात विकासाचा आलेखच मोठा ठेवलेला आहे त्यामुळे आजही माजी आमदार यांच्या टीमवर नागरिकांना आपुलकी वाटते .

दरम्यान, नवनवीन शहरात ग्रामीण भागात फड्या तयार होत असून, अनेक नगरसेवकांच्या इच्छुकांनीही भाजपाच्या छत्राखाली निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.ग्रामीण भागातील व शहरातील माजी आमदार बोदकुरवार  यांनी मिळून भाजपाच्या पायाभरणीला भक्कम आकार दिला आहे.लोकांचा कल भाजपाकडे झुकलेला असून, “नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याची वेळ आता आली” असा आत्मविश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांत दिसून येतो. स्थानिक राजकारणातील पुढील समीकरणे पाहता, भाजपाची लाट नगरपरिषदेपर्यंत पोहोचणार यात शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments