विदर्भ न्यूज, डेस्क:- अमृत महाआवास अभियान २०२२-२३अंतर्गत वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांचे हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरंपच, सचिव आणि घरकुल लाभार्थी यांच्या भव्य सत्कार समारंभ ता. २३ ऑक्टो.रोजी पंचायत समिती भद्रावती येथे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्तावाढीसाठी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि. २० नोव्हें, २०२३ ते ५ जून,२०२३ या कालावधीत अमृत महा आवास अभियान २०२२-२३ राबविण्यात आले. सर्वांसाठी घरे २०२२-२३ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हा अभियानाचा उद्देश होता. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, मंजुरी देणे, पहिल्या हप्त्याचे वितरण करणे, १०० टक्के भौतिकदृष्ट्या घरकुल पूर्ण करणे, अशा विविध निकषांवरती गुणांकन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट तालुका, उत्कृष्ट क्लस्टर, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट वित्तीय संस्था असे विविध पारितोषिके प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट घरकूल – प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
1. प्रथम पुरस्कार – बबिता सुरेश मडावी – ग्रा.पं. चालबर्डी रै.
2. द्वितीय पुरस्कार – हनुमान निळकंठ गोवारदिपे – ग्रा.पं.शेगांव (खुर्द)
3. तृतीय पुरस्कार – अनिता दिलीप बोढे – ग्रा.पं. जेना
2. उत्कृष्ट घरकूल – राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण
1. प्रथम पुरस्कार – अर्जून गुलाब कुळमेथे – ग्रा.पं. मांगली रै.
2. द्वितीय पुरस्कार – पंकज गणपत मानकर – ग्रा.पं.कोकेवाडा मा.
3. तृतीय पुरस्कार – गजानन भाऊराव गेडाम – ग्रा.पं. आष्टी का.
3. उत्कृष्ट ग्रामपंचायत – प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (सरपंच-सचिव )
1. प्रथम पुरस्कार – ग्रा. पं. कोंढेगांव मा.
2. द्वितीय पुरस्कार – ग्रा. पं. वायगांव तु.
3. तृतीय पुरस्कार – ग्रा. पं. शेगांव (खुर्द)
4. उत्कृष्ट ग्रामपंचायत – राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण( सरपंच-सचिव)
1. प्रथम पुरस्कार – ग्रा. पं. मांगली रै.
2. द्वितीय पुरस्कार – ग्रा. पं. चालबर्डी रै.
3. तृतीय पुरस्कार – ग्रा. पं. कढोली
5. उत्कृष्ट क्लस्टर अंतर्गत मिलींद नागदेवते, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि राकेश तुरारे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात गटविकास अधिकारी, पं. स. भद्रावती आशुतोष सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे,कृषी अधिकारी सुशांत गाडेवार,विस्तार अधिकारी पं. स.भद्रावती मनोहर कापकर,सर्व सरपंच, ग्रामपंचायत सचिव व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.