Ajay Kandewar, Wani : शहरातील पंचशील नगर परिसरात 112 वरून आलेल्या तातडीच्या कॉलनंतर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणाला गुरुवारी(ता.11.डिसें )एक मोठा टर्निंग पॉईंट मिळाला. सलग दोन दिवस या कारवाईवर लक्ष ठेवून असलेले फूड ऑफिसर अचानक वणी शहरात दाखल होताच अवैध तंबाखू रॅकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली. त्यांच्या धडक प्रवेशाने तस्करांचे सर्व गणितच विस्कटले.
विदर्भ न्यूज पोर्टल चा सतत बातमीचा पाठलाग पाहता सायंकाळी 6 वाजता “फूड ऑफिसर” यांनी थेट वणी पोलिस ठाण्यात उपस्थित राहून जप्ती प्रकरणाची क्राइम स्टाईल सखोल चौकशी सुरू केली. कागदपत्रांची तपासणी, जप्त मालाचे पॅटर्न, पुरावे, व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज, वाहनाच्या हालचाली—अशा सर्व स्तरांवर रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली.तपास पुढे जात असताना या प्रकरणातील संबंधित वाहन MH-24-BL-7051 या एकामागून एक धागे जोडले गेले आणि अखेर त्या वाहनाचा ‘ चालक आणि मालक आणि तो जबाबदार व्यक्ती’ तस्करीतील थेट भूमिका’ प्राथमिकरित्या सिद्ध झाली. तीघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. तंबाखू रॅकेटमधील पुढील नावे कोणती, कोणाच्या आश्रयाने माल शहरात उतरवला जात होता, हा व्यवहार किती दिवसांपासून सुरू होता याचा धागा पोलिस आता जोरात खेचत आहेत आणि एका विक्रेत्यांचे जोरदार नाव सुरू देखील आहे.
“सप्लाय चेन’वर अन्न व औषध विभागाची करडी नजर…..
या प्रकरणातील संबंधित वाहन MH-24-BL-7051 या क्रमांकावरून तस्करांचा मोठा नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता आहे. वाहन जप्त करण्याची प्रक्रिया वेगात असून संपूर्ण ‘सप्लाय चेन’वर अन्न व औषध विभागाची भूमिका विशेष ठळक झाली आहे.त्यांची शिस्तबद्ध, पद्धतशीर आणि ‘नो-नॉन्सेन्स’ कारवाई तंबाखू माफियांसाठी थेट धक्का ठरली आहे.नियमांचे पालन न करणाऱ्यांसाठी किंवा बनावट परवाने, काळा धंदा, गुप्त वाहतूक अशा कोणत्याही प्रकाराला विभागाकडून शून्य सहिष्णुता असेल, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. त्यांच्या समयोचित हस्तक्षेपामुळे हे प्रकरण अडकून पडण्याऐवजी थेट गुन्ह्यापर्यंत पोहोचले.या धडाकेबाज कारवाईनंतर वणीतील तंबाखू तस्करांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. शहरात आता एकच चर्चा “पुढचा हात त्याचावर का ?” येत्या काहीं दिवसांत उघड होणार आहे.
या प्रकरणात झालेला गुन्हा दाखल….
अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२), कलम २७ (३), सहवाचन कलम ३० (२) (ए) चे उल्लघंन केले आहे, जे अन्नसुरक्षा व मानक कायदयाच्या कलम ५९ अंतर्गत बिएनएस चा वेगवेगळ्या कलम अंतर्गत गुन्हा नोंद करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला संपुर्ण साठा एकूण ४५ किलो वजन व रु ५५ हजार १८२.५/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला.प्रतिबंधित अन्नपदार्थ वाहतुक/विक्रीसाठी इतर सबंधित जबाबदार व्यक्ति यांचेविरुध्द वर नमुद कलमान्वये फिर्याद नोंदवून सदर संबंधित आरोपींचे नाव, गाव व ते कोण आहेत, त्यांनी हा प्रतिबंधित माल कोणत्या ठिकाणावरुन आणला तसेच कोणत्या ठिकाणी विक्रीसाठी आणला, त्याचा संपुर्ण तपास तसेच या प्रतिबंधित अन्नपदार्थाचे इतर संबंधित पुरवठादार/उत्पादक स्तरापर्यंत तपास होऊन गुन्हयाची वणी पोलिस सखोल चौकशी करीत आहे.तीघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

