•गावातील उच्चशिक्षित व उत्तम स्वभावाचा युवक हरपला.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील राजुर कॉ येथील अभिमन्यू येसांबरे यांचा लहान मुलगा प्रशांत अभिमन्यू येसांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवार ता.25 रोजी प्रशांत याची प्राणज्योत मालवली. 
प्रशांत अभिमन्यू येसांबरे (30) रा. राजूर वॉर्ड क्र.4 याच्यावर काही दिवसांपासून नागपूर येथे उपचार सुरू होते . गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वस्थतेमुळे ते नागपूर येथे भरती करण्यात आले होते. दरम्यान त्याला शारीरिक काही त्रास होत असल्याने त्याला नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
याच्या दुःखद निधनाने शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे .प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे . एक वेगळी व्यक्तिमत्व व मित्रांना आपल्या हसत्या भाषेत मंत्रमुग्द करणारा तसेच गावातील एक उत्तम स्वभावाचा युवक निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे.त्यांचे पार्थिव शरीर त्यांचा राहत्या घरी राजुर येथे ठेवण्यात येणार आहे. राजुर येथील मोक्षधामात अंत्यविधि आज दिनांक 25.2.2024 ला सुमारे 4 वाजताच्या दरम्यान करण्यात येईल.त्याच्या मागे आई, वडील, भाऊ , बहिण व मोठा आप्त कुटुंब आहे.

