Ajay Kandewar,Wani:- प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेविका पदासाठी सौ.धम्मदिन पाते यांनी उमेदवारी दाखल केली आहे. धम्मदीन या महिलेतील नेतृत्व म्हणून हरीश पाते यांची ओळख स्थानिक पातळीवर आहे. सुस्वभावी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे त्या परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झालेल्या दिसतात.

उमेदवारी जाहीर करताना सौ.धम्मदिन हरीश पाते यांनी उमेदवारी ६.प्रभागातील पायाभूत सुविधा, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, तसेच तरुणांसाठी उपलब्ध संधींच्या विस्तारावर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना राबवण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रभागातील काही रहिवाशांनी तरुण व नवनवीन विचारांची उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व उदयास येणे हा सकारात्मक बदल असल्याची प्रतिक्रिया देखील मिळत आहे.

