•17 गोवंशांची सुटका तर दुसरी रेतीची अवैध वाहतूक जप्त.
•एकूण 8 लाखाचा वर मुद्देमाल जप्त.
अजय कंडेवार,वणी:- मुकुटबन तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन (Patan Police Station) हद्दीतील कायदा सुव्यवस्था (Law & Order) अबाधित राहण्यासाठी पथकाकडून हद्दीत गस्त (Police Patroling) घालण्यात येत आहे. दरम्यान पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील (Sandip Patil) व कर्मचाऱ्यांनी एक दमदार कामगिरी करत, एकाच दिवसात, दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 8 लाखाचा वर एकूण मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे.

पहिली कारवाई .दि.08 फेब्रुवारी रोजी पाटण पोलीस स्टेशन येथे खबऱ्याचा माहितीवरून झरी जामणी तालुक्यातील वठोली गावा जवळ पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याची मिळताच पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व पथक तात्काळ पोहोचून एक ट्रॅक्टर ज्यामध्ये एक ब्रास रेती असलेला पकडला, सदर रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास रेती वाहतुकीच्या परवाना बाबत विचारले असता, त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून पाटण पोलिसांनी ट्रॅक्टर मुंडा क्र.MH-29- V-4511 व बिना नंबरची ट्रॉली असलेला ज्याची किंमत अंदाजे 6 लाख रुपये व 1 ब्रास रेती कीं 6000 रुपये असा मुद्देमाल जप्त केला व वाहन चालक-मालक रमेश रेड्डी कोल्हेकर(वय23वर्ष) रा.पाटनबोरी ता.केळापूर,जि.यवतमाळ याच्यावर रेती चोरी बाबत भा.द.वि सहकलम 48(7),48(8) जमीन महसूल कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई...दि.08 फेब्रुवारी रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना काही इसम गोवंशीय जनावरे पायी आंबेझरी ते शिबला रस्त्याने तेलंगाना राज्यात कत्तली करिता घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळल्यावरून त्यांनी पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस अंमलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक तयार करून पाटण व मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले आंबेझरी-शिबला जंगल परिसरात रवाना केले. त्यावरून पोलिस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन 3 इसम व 17 गोवंशीय जनावरांसह पकडले.त्यांची विचारपूस केली असता तिन्ही इसमांनी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे सदरचे 17 गोवंशीय जनावरे कत्तलिकरीता विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.त्यावरून पोलिसांनी तीन इसमांना 2लाख 12 हजार रुपये/- किमतीच्या जनावरांसह ताब्यात घेतले वते सर्व जनावरे चारा पाण्याकरीता चैतन्य गोरक्षण ट्रस्ट, मांडवी येथे दाखल केले. जनावरे पायी घेऊन जाणारे मजूर व त्यांचे मालक मंगेश रामकृष्ण मेश्राम रा.माथार्जुन 2) सदाशिव गोविंदा मडावी रा.माथार्जुन 3)प्रवीण शंकर दुधकर रा.सुसरी 4)शेख नजीर शेख हसन रा.पाटनबोरी 5)फकीर मोहम्मद शेख बशीर रा.मारेगाव 6)शेख जमीर शेख रहमान रा.पाटनबोरी अश्या एकूण 6 जणांविरोधात पाटण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले.
सदरचा दोन्ही कारवाया वरिष्ठांचा मार्गदर्शनात पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अंमलदार विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, अतुल,अमोल नुन्नलवार,सुरेश राठोड,पोलीस अंमलदार प्रशांत तलांडे, नरेश गोडे, अमित पोयाम, सचिन गाडगे, रतिष वानखेडे व हेमंत कामतवार यांनी पार पाडली.

