• पाटण पो. स्टे. अवैध धंद्यांचे माहेर घर बनले.
अजय कंडेवार,वणी:- पाटण स्टेशनचा हद्दीत येणाऱ्या कोडपाखिंडी जवळील जंगलातील कोंबडा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेत दोन लाख पंचवीस हजार, आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पचक वणी येथे हजर असतांना गोपनीय माहिती वरून, पाटण पोस्टे. हद्दीत पेणाऱ्या कोडपाखिंडी गावाच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम कोंबडयाच्या पायाला लोखंडी काती बांधुन त्याची झुंज लागुन त्यावर पैशांची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळवित असल्याची विश्वसनीय खबर मिळाल्याने पथकाने स्थानिक पोलीस स्टेशन मधील अंमलदाराला सोबत घेवून कोडपा खिंडी बाजुला असलेल्या जंगल परिसरात जावुन छापा टाकला असता, गंगाधर अय्या आत्राम वय २५, रा. माडवा ता. झरी, जिवन सुनिल मानकर २५, रा. कोडपाखिंडी, अनिल रामचंद्र पावडे ५६, लहान पांढरकवडा, भिमराव धर्माजी पेदोर ४४, रा. टेंबी ता. झरी, शंकर विठ्ठल आकुलबार ३० रा. माडवा ता. झरी, शंकर सुर्यभान बोपाटे ४९, रा. माकीं ता. झरी, लक्ष्मण रामा आत्राम ४०, रा. माड़वा ता. झरी, हे मोक्यावर गवसले, संबंधित इसमांची झाडाझडती केली असता त्यांचे जवळून १८ हजार सातशे ८०, रुपये रोख, ४ नग लोखंडी काती व झुंज लढविण्यासाठी वापरात आणलेले ४ कोंबडे तसेच सात मोटार सायकल असा एकुण दोन लाख, २५ हजार आठशे ६० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला संबंधित आरोपीतांविरुच्द पोलीस स्टेशन पाटण येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही वरिष्ठांचा आदेशाने सपोनि अतुल मोहनकर,सपोनि संदीप पाटील,योगेश हगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे,निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके स्था. गु.शा. यवतमाळ तसेच पोलीस अंमलदार अमित पोयाम पो.स्टे. पाटण आदींनी केली आहे.