Ajay Kandewar,Wani:– संजय देरकर यांच्या रूपाने संयमी उमेदवार लाभला आहे म्हणून “तो काँग्रेसचा मोठा नेता” वणी विधानसभा निवडणुकीत कुठलेही किंतू-परंतु न करता प्रामाणिकपणे संजय देरकर यांचे काम खुल्या मनाने केले. विशेषतः “या” मोठया नेत्याने “देरकर भाऊंचा” विजयासाठी झरी तालुक्यातील अनेक पोडात सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत घेत “काँग्रेसचा त्या मोठ्या नेत्याने”स्वतःपुढाकार घेत अनेक कॉर्नर सभा घेतल्या तसेच ग्रामीण भागात जाऊन डूअर टू डूअर “देरकर ” यांच्यासाठी प्रचार करीत तिन्ही तालुके पिंजून काढले आणि तन मन धनाने संजय देरकर यांच्या शब्दाला मान देत आघाडी धर्म पाळला. असेही बोलल्या जात आहे. पण काँग्रेसचा वारंवार डीचविण्याचा धोरणाने त्या “मोठ्या काँग्रेस ” नेत्याने पक्षच सोडण्याचा निर्णय घेतल्याने पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व नाराजीचे वातावरण ही आहे अशी खमंग चर्चा वणी विधानसभेत ऐकू येत आहे.
वारंवार पक्षाचे “वरिष्ठ” काहीं “नेतृत्व”त्यांना डावलत असल्याने ऐन विधानसभेचा निवडणुकीतच घरवापसी होणारं असल्याची दबक्या आवाजात चर्चाही होत्या परंतु “संजू भाऊ” यांना दिलेला शब्द पाळला असल्याचंही काँग्रेसचा गोटयातून आता बोलल्या जात आहे. म्हणून या चर्चेला आता उत येऊ लागला आहे. विधानसभेचा निकाल लागताच काँग्रेस पक्षात मिळणारी वागणूक बघता “तो नेता” राष्ट्रवादीचा वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने वणी विधानसभेत “काँग्रेसला राजकिय धक्काच”मानला जात आहे. कदाचित काँग्रेसमध्ये चालणारी अंतर्गत गटबाजी व वागणुकिला कंटाळलेल्या “या नेत्याने” हा निर्णय घेत असल्याचेही विश्वसनीय माहीती समोर येत आहे. परंतु ही चर्चा याबाबत महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांच्या पर्यंत पोहोचली असल्याचे समजते आहे .आता”त्या मोठ्या काँग्रेस नेत्यासाठी” “देरकर भाऊ “काय करतात हे देखिल पाहणे तेव्हढेच महत्वाचे असणार आहे.